Shiv Sena Uddhav Thackeray First Reaction After Sanjay Raut Bail Granted : संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. अशातच शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांचं अभिनंदन केलं आहे. 


संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी संजय सावंत यांच्या फोनवरून संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरेंशी बोलताना संजय राऊत भावूक झाल्याचं बोललं जात आहे.


संजय राऊत डरपोक नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे."


अखेर 100 दिवसांनी राऊतांना जामीन मंजूर 


संजय राऊत तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला आहे. पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sanjay Raut Bail : संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे