Sanjay Raut Press News : मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांसाठी लवकरच उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरु केलं जाणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, त्याचप्रमाणे मूळ राज्यात गुंतवणूक, रोजगार, पर्यटन आदींसाठी त्यांच्याशी समन्वय साधला जाणार आहे. योगी सरकार हे कार्यालय लवकरच मुंबईत सुरु करणार आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सुद्धा लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार आहोत, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


राऊत यांनी म्हटलं की, मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची भवनं उभी केली आहेत. देश हा एक आहे असं आपण म्हणतो तर कोणत्याही राज्यात जाऊ-येऊ शकतो. आम्ही अयोध्येत जाऊन एक सेंटर उभा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे. देश एक आहे राज्यात अनेक राज्याची कार्यालय आहेत. हा सरकारी विषय आहे, खासगी विषय नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी सुद्धा अनेकदा सल्ला घेत असतात शरद पवारांचं मार्गदर्शन घेत असतात. त्यांनीच याबाबत सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले. 


फक्त  किरीट सोमय्या यांचीच नाही तर भाजपच्या 28 लोकांची प्रकरणं
सोमय्या यांच्यावर आरोप करताना राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या हे स्वतःला भ्रष्टाराचाराचे विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. आज मी यांचा खरा चेहरा काय आहे याचं प्रकरण काढलं आहे. मोतीलाल ओसवाल आणि कंपनी शेअर बाजार कंपनीत 5 हजार 600 कोटींचा घोटाळा झाला होता. या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केली होती. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून लाखोंच्या देणग्या मिळाल्या आहेत. मी फक्त लहान गोष्टी देत आहे, दोन चेक दिलेले आहेत. या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे तुम्ही कुठला भ्रष्टाचाराचा लढा लढत आहात. तुमचं काय उत्तर आहे. त्यात तुमचा खुलासा आलेला नाही. युवक प्रतिष्ठाण हे ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा उद्योग आहे. या सगळ्याची चौकशी धर्मादाय आयुक्त, आर्थिक गुन्हे विभागाकडे याची मागणी केली आहे ईडीला मागणी करणार आहे, असं राऊत म्हणाले.


राऊत म्हणाले की, भाजपच्या 28 लोकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत ते बाहेर काढू. हा राष्ट्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा विषय आहे. ही एक प्रकारची खंडणी आहे.  किरीट सोमय्या यांचा चेहरा उघड झाला आहे  याला भाजप भराचारविरुद्ध लढ्यात सूत्र दिले आहे. यांचा खेळ संपला आहे.  त्यांनी सुरुवात केली,  शेवट आम्ही करू. प्रकरण फक्त  किरीट सोमय्या यांचं नाही तर भाजपच्या 28 लोकांची प्रकरणं आहेत.