Shiv Sena Meeting at BKC Ground on 14 May 2022 : मुंबई पालिकेने (BMC) 'सर्वांसाठी पाणी' हे नवे धोरण जाहीर केलं असून या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मी 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. अशातच आज शिवसेनेकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 मे रोजी बीकेसीमधे होणाऱ्या जाहीर सभेचा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsenapramukh Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता 14 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री कोणाचा मास्क काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



"मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे." हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. तसेच, "साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे.", असं आवाहनंही या टीझरमधून करण्यात आलं आहे. 


काय म्हणाले होते मुख्यमंत्री? 


"14 तारखेला माझी सभा आहे. मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं तुबलेलं नाहीय पण मनात काही गोष्टी आहेत, त्या बोलणार आहे. 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. तसेच, "गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही.", असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ठरलं! संजय राऊतांनी सांगितला आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा 'हा' मुहूर्त