मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. अशातच प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का बसणार आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश पुर्वेश यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या पाठोपाठ पुर्वेश सरनाईक यांचीही चौकशी होणार आहे.


काही दिवसांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरी धाड टाकली होती. त्या धाडीमध्ये ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचं सांगण्यात येत होतं. यासंदर्भात बोलताना आपल्या घरात कोणतंही पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं नसल्याचं स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. तसेच अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा ईशाराही त्यांनी दिला आहे.


पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, "माझ्या घरी कोणत्याही प्रकारचं पाकिस्तानी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सापडलं नाही. पाकिस्तानच्या विरोधात अनेक वर्षांपासून लढणाऱ्या प्रताप सरनाईंकांकडे पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड सापडलं असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. तसेच अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यां विरोधात कारवाई करणार आहे."


पाहा व्हिडीओ : "पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याच्या बातम्या खोट्या, कुठल्याही चौकशीला तयार" - प्रताप सरनाईक



प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड


24 नोव्हेंबर रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीन धाड टाकली होती. तसेच चे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. टॉप सिक्युरिटी घोटाळाप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयवर धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीने चौकशी करता ताब्यात घेतलं होतं. जवळपास पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. ईडीने केलेल्या कारवाईबाबत कळताच प्रताप सरनाईक भारतात परतले होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल