मंबई : मराठी अस्मितेच्या मुद्दयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. शिवसैनिकांनी दुकानाच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासले. तसेच त्यांनी मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधीच मराठी पाट्यांबाबत 30 जुलैची डेडलाईन दिली होती. पण या डेडलाईन पालन केले गेले नसल्याचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी सांगितले. तसेच शिवसैनिकांनी आठ दिवस अगोदरच दुकानमालकांना मराठी पाट्यांबाबत सूचनाही दिल्या होत्या. म्हणून आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाख़ाली हे आंदोलन करण्यात आले. मीरा रोड येथील हाटकेश, जीसीसी क्लब या भागात हे आंदोलन केले गेले. यापूर्वी मनसेने सुद्धा मराठी पाट्यांचा मुद्दा उचलून धरत आंदोलन केले होते.
मराठी पाट्यांवर आता शिवसेना आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2018 02:09 PM (IST)
मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. शिवसैनिकांनी दुकानाच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासले. तसेच त्यांनी मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -