Yuva Sena Vs Yuva Sena : शिवसेना (Shiv Sena) आमदार आणि खासदार फुटले तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भोवती असणाऱ्या नेत्यांवर आरोप झाले. युवा सेना (Yuva Sena) फुटली आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भोवती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने निशाण्यावर आहेत ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सुरज चव्हाण आणि आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र राहुल कनाल. या तिघांवर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आणि आदित्य ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला.
एकामागोमाग एक सुरु असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गटाची युवा सेना अधिकाधिक स्ट्राँग होत चालली आहे. शिवसेनेसोबत युवा सेनेवर शिंदे गटाचा दावा स्ट्राँग होत चालला आहे.
शिंदे गटात सहभागी झालेल्या एकाही पदाधिकाऱ्याने आदित्य ठाकरेंवर बोलणं टाळलं पण त्यांच्या भोवती असणारा पदाधिकाऱ्यांबद्दल वर्षानुवर्ष साठवलेलं मनातून बाहेर काढलं. जी रणनीती आमदार आणि खासदारांनी वापरली अगदी तशीच रणनीती आता युवा सेनेचे पदाधिकारी वापरत आहेत. सध्या या विषयांवर आदित्य ठाकरेंच्या टीमकडून सर्वजण चुप्पी साधून आहेत.
एक नजर टाकूया युवा सेनेच्या संघटनेवर
युवा सेना प्रमुख - आदित्य ठाकरे
सरचिटणीस - अमोल किर्तीकर
सहसचिव - एकूण 54 पदाधिकारी
विभागीय सचिव - एकूण 6 पदाधिकीरी
सचिव - पूर्वेश सरनाईक, दुर्गा भोसले आणि वरुण सरदेसाई
कार्यकारणी - एकूण 17 पदाधिकारी
विस्तारक - एकूण 72 पदाधिकारी
आता त्यापैकी शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांवर एक नजर टाकूया
सरचिटणीस - अमोल किर्तीकर (शिंदे गटाच्या मार्गावर)
सहसचिव - एकूण 54 पदाधिकारी
शिंदे 24 पदाधिकारी सहभागी
विभागीय सचिव - एकूण 6 पदाधिकारी
शिंदे गटात 1 पदाधिकारी सहभागी
सचिव - पूर्वेश सरनाईक, दुर्गा भोसले आणि वरुण सरदेसाई.
शिंदे गटात 1 सचिव सहभागी
कार्यकारणी - एकूण 17 पदाधिकारी
शिंदे गटात 3 पदाधिकारी सहभागी
विस्तारक - एकूण 72 पदाधिकारी
शिंदे गटात 21 विस्तारक सहभागी
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना थेट रंगला. आता श्रीकांत शिंदे पडद्यामागून सर्व धुरा सांभाळत आहेत. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे युवा सेनेची कमान हाती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचं थेट आव्हान आता आदित्य ठाकरेंना दिलं आहे. शिवसेना उभी फुटलेली सर्वांनी पाहिली आता युवा सेना वाचवण्याचं काम आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर आहे.