Sheetal Mhatre Prakash Surve Viral Video: आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणांमध्ये दहिसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा नेते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे, ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. आज संध्याकाळच्या सुमारास त्यांना मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, आता अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या ऑफिशिअल सोशल अकाउंटवरून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामध्ये साईनाथ दुर्गे यांचा सहभाग आहे असा पोलिसांना संशय आहे. 


दरम्यान, साईनाथ दुर्गे यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यामध्ये साईनाथ दुर्गे यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत. आज सकाळी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. 


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र  म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे नेते असून बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. 


साईनाथ दुर्गे यांच्यासोबत पोलिसांनी विनायक डावरे यांनाही ताब्यात घेतलं आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होते आणि रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरे यांना व्हिडीओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती पोलिसांना आहे. 


दरम्यान, व्हायरल होणारा व्हिडीओ हा मॉर्फ केला असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.


साईनाथ आमचा वाघ... आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया 


साईनाथ आमचा वाघ आहे... तो लढत राहणार, आम्ही लढत राहू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aditya Thackeray reaction on Sainath Durve arrest) यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयावरुन दुर्लक्ष करण्यासाठी हे प्रकरण समोर आणलं असल्याचा आरोप त्यांनी केला.


आदित्य ठाकरे म्हणाले की, आज या प्रकरणामुळे कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य लपलेलं आहे, भाजपच्या एका सदस्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यावर कुणाचं लक्ष नाही, तसेच शिंदे गटाच्या एका आमदाराचे गोळीबार प्रकरणही यामुळे लपलं गेलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईला येत असून त्यावर कुठेही बातम्या येत नाहीत. महत्त्वाचे विषय दाबायचे आणि असं काहीतरी करत राहायचं हेच सुरू आहे. 


ही बातमी वाचा: