दहीसरमध्ये म्हात्रे आणि घोसाळकरांची एकमेकांविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2017 01:08 PM (IST)
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 म्हणजेच दहीसरमध्ये निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत आहे. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकरांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. घोसाळकर पती-पत्नी आणि शिवसैनिक चेतन परमार यांनी दारु पिऊन आपल्याला धमकावल्याचा आरोप शितल म्हात्रे यांनी केला आहे. तर शितल म्हात्रेंनी दोन दिवसांपूर्वी आपला कार्यकर्ता कार्मो मोंटेरोच्या कानाखाली मारल्याची तक्रार तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. शितल म्हात्रेंविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी दाखल केलेली तक्रार शितल म्हात्रे यांच्या गैरवर्तनाबाबत तक्रार दाखल झाल्यानेच शिवसैनिकांविरोधात म्हात्रे यांनी तक्रार केल्याचं अभिषेक घोसाळकरांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेतर्फे अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर तर काँग्रेसतर्फे शीतल म्हात्रे वॉर्ड क्रमांक 1 मधून रिंगणात आहेत.