शीना बोरा हत्याकांड : पीटरचा हत्याकांडात सहभाग नव्हता, वकिलांचा दावा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 24 Jan 2019 06:50 AM (IST)
निव्वळ इंग्लंडहून आलेल्या 'त्या' फोन कॉल्सवरून इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीदेखील या हत्याकांडात सामिल आहे, किंवा त्याला या सर्व घटनेची माहीती होती असं सिद्ध होत नाही. असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणी पीटर मुखर्जीनंच इंग्लंडहून ते कॉल्स इंद्राणी मुखर्जीला केले होते कशावरून? असा सवाल उपस्थित करून पीटर मुखर्जीचा या संपूर्ण हत्याकांडात सहभागच नव्हता असा युक्तिवाद पीटरच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. पीटर मुखर्जीनं सीबीआय कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हा युक्तिवाद करण्यात आला आहे.