मुंबई: पीटरला वैवाहिक जीवनात खूष नव्हता, त्यामुळे त्याला तरुण मुलींची सोबत आवडायची. म्हणून आपण घटस्फोट घेतला, असा जबाब पीटरची घटस्फोटीत पत्नी शबनम सिंगने सीबीआयला दिला.

 

पीटर सतत रात्रीच्या पार्ट्या करायचा. सतत आपल्या सोबत तरुण मुली असाव्यात असे त्याला वाटायचे, मला ते आवडत नव्हते. त्यामुळे मी घटस्फोट घेतला. त्यानंतर कोलकत्ता येते असताना इंद्राणीने मला फोन केला. पोटगीची रक्कम एकदाच ठरवं व अधिक रक्कम मागू नकोस, असे तिने मला सांगितले होते. मात्र, हा माझा आणि पीटरचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे सांगून मी फोन ठेवून दिला, असेही सिंगने जबाबात नमूद केले.

 

शीनाची एप्रिल 2012 मध्ये हत्या झाली. याप्रकरणी गेल्यावर्षी पोलिसांनी इंद्राणीला अटक केली व त्यानंतर संजीव खन्ना तसेच शामवरला अटक केली. हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग झाल्यानंतर पीटरला अटक झाली. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झाले आहे.