मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल, पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही, असेही मत पवार यांनी व्यक्त केलं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी राफेलपासून सेना-भाजप युतीपर्यंत अनेक विषयांवर मतं व्यक्त केली.
“राफेलसाठी जेपीसीची मागणी फार काळ टाळता येणार नाही”
राफेलवरुन सर्वच विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरण्यास सुरुवात केली असताना, शरद पवारांनीही पुन्हा एकदा बोफोर्सचा दाखला देत, राफेलच्या जेपीसीची मागणी केलीय. “बोफोर्सची संयुक्त संसदीय समितीची (JPC) मागणी करणारा पक्ष भाजपच होता, त्यामुळे त्यांना आता राफेलच्या संयुक्ती संसदीय समितीच्या चौकशीची मागणी फार काळ टाळता येणार नाही”, असे शरद पवार म्हणाले.
शिवसेना-भाजप युती?
शिवसेना आणि भाजप युतीबाबतही शरद पवारांनी अंदाज व्यक्त केला. पवार म्हणाले, “शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही.”
लोकसभा-विधानसभा एकत्र होतील?
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत. कारण आता तशी परिस्थती राहिली नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एकत्र होतील, अशा चर्चा सुरु आहेत. अगदी राष्ट्रपतींनीही ‘एक देश, एक निवडणूक’चा उल्लेख केला होता. त्यामुळे लोकसभा-विधानसभा एकत्र होतील, असे अंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून व्यक्त केले जात आहेत.
“ईव्हीएमबाबत लवकरच सर्व विरोधी पक्षांची बैठक”
तसेच, ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष आवाज उठवत असताना, पवारांनी अत्यंत महत्त्वाची माहिती यावेळी दिली. निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावे म्हणून सगळ्या विरोधी पक्षांची येत्या 15 दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पवारांनी दिली.
राफेल, ईव्हीएम ते सेना-भाजप युती, शरद पवारांना काय वाटतं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2018 10:10 AM (IST)
“शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही.”
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -