मुंबई : शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर रात्री जीवघेणा हल्ला झालाय. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यातून आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह 2 कार्यकर्ते जखमी झालेत.


महाराष्ट्र नगर भागात मेट्रो कारशेड तयार करण्याचे काम रात्रंदिवस सुरु असल्याने याचा तेथील स्थानिकांना त्रास होत आहे. हे काम  तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी त्यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलं होतं. काल रात्री महाराष्ट्र नगरमधील देवीच्या मंडपात बसले असता, त्यांच्यावर 5 ते 6 जणांनी जीवघेणा हल्ला केला. मेट्रोच्या कंत्राटदारांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तुकाराम कातेंनी केलाय.

कोण आहेत तुकाराम काते?

तुकाराम काते हे शिवसेनेचे मुंबईतील आमदार आहेत. मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून काते विधानसभेत निवडून गेले आहेत.