देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
देशात जर जन्मला तर त्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं त्याला का बोलायला सांगितलं जातं. या पूर्वी मी कधी मॉब लिचिंग हा शब्द ऐकला नव्हता, असे पवार म्हणाले.
राज्यात ओला दुष्काळ आला. एवढी पूरस्थिती आली पण देशाचे प्रमुखांनी याची पाहणी देखील केली नाही, असा आरोप पवार यांनी केला.
नवीन एक पार्टी आली आहे वंचित बहुजन आघाडी. वंचित ज्या पद्धतीने जात आहे त्यांची नियत साफ नाही असं चित्र आहे. वंचितकडून सेक्युलर आहे असं सांगितलं जात आहे, मात्र फायदा भाजपला करत आहेत, असेही पवार म्हणाले.