मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या भेटीला गेले आहेत. आशिष शेलारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज संध्याकाळी पोहोचले.
शरद पवार आणि आशिष शेलार यांनी भेट राजकीय असल्याची माहिती आहे. केंद्रातील आणि राज्यातील राजकीय विषयांवर भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पवार आणि शेलार यांच्या या भेटीमागे उद्याच्या राजकारणातील चाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी सरकारविरोधात पवारांच्या नेतृत्वाखाली इतर पक्ष जमत आहे. तसंच राज्यातही पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत आहे.
अमित शाह यांनी मुंबईत टीका केली होती की, पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर राहुल गांधी टीका करतात. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पवारांना मोदींच्या नादी लागू नका असा इशारा दिला होता. त्यामुळे या भेटीला खूप महत्व आहे.
एकीकडे भाजप एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला चुचकारात आहे, शिवसेना मात्र अजून ही भाजप विरोधाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे या पवार आणि शेलार भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार आशिष शेलारांच्या भेटीला, राजकीय विषयांवर चर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2018 07:31 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या भेटीला गेले आहेत. आशिष शेलारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज संध्याकाळी पोहोचले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -