Shambhuraj Desai on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्या भडक वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार असेल तर कायदा कायद्याचे काम करेल. पोलीस पोलिसांचे काम करतील, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


शंभूराज देसाई म्हणाले, मनोज जरांगे पाटील दररोज आपली भूमिका बदलत आहेत. वेगवेगळी भूमिका मांडत आहेत, चुकीचे वक्तव्य करत आहेत हे त्यांनी थांबवावे.  मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन संदर्भात तर आपण माध्यमांनी सुद्धा आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा थोडं मागं वळून बघावं लागेल की सुरुवात कशी झाली? मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पूर्वजांकडे कुणबी नोंद होत्या. त्यांच्या कुणबी नोंदणी वारसांना मिळावेत यापासून पहिली सुरुवात झाली. 


जरांगे पाटील म्हटले होते की, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. सरकारने त्याच्या बाबतीत निर्णय घेतला. परंतु ते काय म्हणाले? आता हे सगळ्या महाराष्ट्रात करा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारने सर्व यंत्रणांना कामाला लावलं, असंही देसाई यांनी नमूद केलं. 


एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्राभर सर्वेच्या कामी लावले


शंभूराज देसाई पुढे बोलताना म्हणाले, परत स्वतंत्र जेव्हा मराठा आरक्षण देण्याचा विषय आला. तेव्हा स्वतंत्र आयोग नेमला, शिंदे समिती नेमली. शिंदे समितीचा अहवाल आला तर एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्राभर त्याच कामांमध्ये आपण लावले, डाटा तयार केला आणि हा केवळ सँपल सर्व्हे नव्हता डिटेल सर्व्हे केला. मराठा समाज हा कसा आर्थिक मागास आहे?  म्हणजे हातगाडी ओढणारे, डबेवाले, पान टपरीवाले, छोटे दुकानदार, माथाडीचे काम करणारे, शेतमजुरी करणारे, ज्यांचा हातावर पोट आहे.


हे सगळे त्याच्यामध्ये आणले आणि कोर्टामध्ये टिकणारे आरक्षण आम्ही दिलं. एवढं सगळं केल्यानंतर जरांगे पाटलांची भूमिका रोज रोज बदलायला लागली. त्यांनी कधी शिंदे साहेबांवर आरोप केला.  कधी फडणवीस साहेबांवर आरोप केला. समन्वयक म्हणून गेलेले किंवा समन्वयाची भूमिका करणाऱ्यांवरही त्यांनी आरोप केले, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. 


'देवेंद्र फडणवीसांबद्दल असंसदीय शब्द वापरले' 


देसाई पुढे बोलताना म्हणाले की, याचा अर्थ जरांगे पाटील रोज रोज आपली वेगवेगळी भूमिका मांडतात. सगळ्यात कहर झाला म्हणजे काल त्याने फडणवीस साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं.अरे तुरेची भाषा केली. जे शब्द आपण उच्चार सुद्धा करू शकत नाही, असे असंसदीय शब्द त्यांनी सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल, सरकारच्या मंत्र्यांच्या बद्दल वापरले.


मराठा समाज जरांगे पाटलांवर नाराज - शंभूराज देसाई 


शंभूराज देसाई म्हणाले,  मराठा समाजामध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे. जरांगे पाटलांना जेवढा मान मराठा समाज देत होता. यांच्या अशा वक्तव्यांमुळे अनेक मराठा समाजातल्या तरुणांची व लोकांची मन दुखावलेले आहेत. काल ते स्वतः म्हटले मी आता सागर बंगल्यावर चाललो आधी म्हणले पण चाललो पुन्हा गाडीत बसले.पुन्हा गावाजवळ जाऊन थांबले. ग्रामस्थांनी आग्रह केल्यावर थोडस पाणी पिले आणि पुन्हा मागे फिरले आणि आपल्या मूळ गावी गेले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'मनोज जरांगे मविआचं प्यादं, शरद पवारांनी आंदोलनाला...'; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप