आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 05:47 PM (IST)
मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यावर दोन गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लाच घेतल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्यमंत्र्यांचे सचीव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात असा आरोप डॉ. राहुल घुले यांनी केला आहे. यांसंदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार तर सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली आहे. तक्रारदार महिलेनं यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं कथन केलं आहे. सुनील माळींमुळे आरोग्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ सुनील माळी हे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत सावलीप्रमाणं वावरतात. त्यामुळं या आरोपांमुळं आरोग्यमंत्र्यांचीही अडचण वाढली आहे.