फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रावादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसकून बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली त्याला आम्ही उत्तर देतोय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केले की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. तर, फडणवीस यांना मुख्यमंत्री उपलब्ध नसतील तर उपमुख्यमंत्री अजितदादाना भेटावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
केंद्राकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी नाही, महाविकास आघाडीचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह घेत. राज्य सरकारला केंद्र कशी मदत करत आहे, त्याची पुन्हा आकडेवारी दिली. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार ही परिस्थिती हाताळायला अपयशी ठरले आहे. केंद्राने मदत करुनही हे सरकार मान्य करत नसल्याची गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार दरवेळी काहीतरी आभासी आकडेवारी फेकत असल्याचं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे
- रेल्वेच्या तिकीटांसाठी राज्य सरकार सात ते नऊ लाख रुपये देते. मात्र, केंद्राला ती रेल्वे चालवण्यासाठई 50 लाख रुपये लागतात.
- कापूस खरेदीसाठी सर्व पैसे केंद्र सरकार देते. त्याप्रमाणे ते पैसे केंद्राने दिले आहेत.
- टॅक्सचे पैसे खातेदाऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत.
- 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 लाख पीपीई किट देण्यात आले आहे. 16 लाख एन 95 मास्क दिले आहेत. ही सामुग्री विकत घेण्यासाठी 468 कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले आहेत.
- मुंबईत कोरोना चाचणी कमी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात 5 टक्के लोक पॉझिटिव्ह निघतात. त्यापैकी महाराष्ट्रात हे प्रमाण 12 ते 13 टक्के आहे. तर, मुंबईत मे महिन्यात हे प्रमाण 32 टक्के इतके आहे.
- दिव्यांगांना केंद्राने दिलेले 122 कोटी रुपये रेग्युलरपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.
- प्रत्येक वेळेस एक आभासी आकडा फेकायचा आणि केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे, इतकंचं सांगण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे.
- केंद्राने नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत राज्याचे जीएसटीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार राज्य सरकारकडून चालला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
- मजुर गेल्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.
- मुंबईत लोकांना खाटा मिळत नाहीत. वेळेवर उपचार मिळत नसल्याने लोकांचे बळी जात आहेत. देशातील 40 टक्के हे महाराष्ट्रात होत आहेत.
- केवळ खोटी आकडेवारी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरू आहे. आम्ही नेहमीचं राज्य सरकारच्या पाठीशी उभे आहोत.
Devendra Fadnavis | केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 28 हजार कोटी रुपये दिले : देवेंद्र फडणवीस