मुंबई : आज महाविकास आघाडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीत कोरोना, लॉकडाऊनसह महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. या परिषदेला मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब एकत्र असणार आहेत.
आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि अनिल परब उपस्थित होते.
कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारसोबत, राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांना फोन
या बैठकीत मुंबईवर चर्चा झाली, मुंबईला पूर्वपदावर आणण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. मुंबईच्या शाळा, दुकानं, रेल्वे हळूहळू योग्य वेळी पूर्वपदावर आणू, असं मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. मुंबईतली परिस्थिती सांगणारे सर्व व्हिडीओ हे फेक आहेत. हे सर्व व्हिडीओ दोन तीन महिन्यापूर्वीचे आहेत, असा दावा देखील अस्लम शेख यांनी केला आहे.
मुंबईतली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. विरोधी पक्षाला राजकारण करायचं करू द्या. या सरकारला कोणताही धोका नाही. कोण कोणाकडे चहा घ्यायला जातं याबाबत भाजपला राजकारण करण्याची गरज नाही. भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे. मुंबईसाठी जे जे योग्य निर्णय आहेत ते आम्ही घेऊ. राष्ट्रपती राजवटची गरज जिकडे आहे तिकडे लावा, असं देखील शेख म्हणाले.
केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली होती.
महाविकास आघाडीची तीन तास बैठक, एकत्र पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाला उत्तर देणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2020 03:13 PM (IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. या परिषदेला मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब एकत्र असणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -