मुंबई : देशातील आर्थिक मंदीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रासह इतर उद्योगांना मोठा फटका बसत आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 770 अंकांनी खाली आला, तर निफ्टी 225 अंकांनी कोसळला आहे.
देशाचा जीडीपी 5.8 वरुन कमी होऊन 5 टक्क्यांवर आला आहे. तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील आकडेवारी पाहिली तर आर्थिक मंदीचं संकट वाढत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार 867 अंकांनी खाली आला होता. बाजार संपताना शेवटी 769.88 अंकांची घसरण झाली. 2.06 टक्के नुकसान होऊन शेअर बाजार 36562.91 अंकांवर बंद झाला. निफ्टी 225.35 अंकांवर 2.04 टक्के नुकसान होऊन 10797.90 अंकावर बंद झाला.
आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, वेदांता, एचडीएफसी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, रिलायंस इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स 4.45 अंकांपर्यंत घसरले आहेत. आयटी कंपन्यांमध्ये टेकएम आणि एचसीएल या दोन कंपन्यांचे शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीया बाजारात रुपयाचं मुल्यही 90 पैशांनी कमी होऊन डॉलरच्या तुलनेत 72.27 रुपये प्रति डॉलवर पोहोचलं आहे.