मुंबई : 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू, असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी दिलाय. एबीपी माझा विशेष या चर्चासत्रात अनिल परब बोलत होते. निकालसंदर्भातली विनोद तावडेंची वक्तव्य म्हणजे त्यांचा अतिआत्मविश्वास आहे अशी टीका देखील परबांनी केली आहे. तावडेंनी दिलेल्या तारखेपर्यंत निकाल घोषित न झाल्यास तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठीच्या सर्व विभागाचे निकाल लागणं अशक्य असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. त्यामुळं तावडेंची अडचण चांगलीच वाढली आहे. विद्यापीठ प्रशासनानं 31 जुलैपर्यंत निकाल घोषित करणं शक्य नसल्याचं कबूल केल्यानं शिक्षणमंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू आहे. आज विनोद तावडेंनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या बैठकीत तावडेंनी विद्यापीठाच्या निकालासंदर्भातले आतापर्यंतचे तपशील राज्यपालांना दिल्याची माहिती मिळतेय. तसेच, निकालाच्या घोळावरून कुलगुरू संजय देशमुखांवर सुरू असलेल्या टीकेसंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  दरम्यान उद्या रविवार असतानाही  कुलगुरू संजय देशमुखांनी 4 महत्त्वाच्या बैठका बोलावल्या आहेत. संबंधित बातम्या

पेपर तपासणीसाठी धमकी, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकाची पोस्ट

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता

मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी

पेपर तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला

पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन