फरहान आझमी, आयेशा टाकियाला हिंदू सेनेच्या कार्यकर्त्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2017 02:40 PM (IST)
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, त्यांचे पुत्र फरहान आझमी आणि सून आयेशा टाकिया यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, त्यांचे पुत्र फरहान आझमी आणि सून आयेशा टाकिया यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे. राजस्थानमधील हिंदू सेनेच्या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचा आरोप फरहान आझमी यांनी केला आहे. फरहान आझमी यांनी सांगितलं की, "धमकी देणाऱ्या व्यक्तीने असभ्य भाषेचा वापर करत बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. तसंच आयेशा टाकियासोबतचं लग्न लव्ह जिहाद असल्याचं सांगत परिणाम भोगण्यास तयार राहा, असं म्हटलं. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांत धमकी देणं आणि धार्मिक भावना भडकावल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस फोन नंबर, फेसबुक प्रोफाईलच्या मदतीने आरोपीला अटक करण्याचीही शक्यता आहे.