अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2019 10:54 PM (IST)
पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत सरासरी 1 ते 2 टक्क्यांनी घसरणही दुसऱ्या गुणवत्ता यादीत पाहायला मिळत आहे.
फोटो - गेट्टी इमेज
मुंबई : अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली आहे. यामध्ये पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत सरासरी 1 ते 2 टक्क्यांनी घसरणही दुसऱ्या गुणवत्ता यादीत पाहायला मिळत आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी या सर्व शाखांसाठी 1,07,785 विद्यार्थ्यांपैकी एकूण 69170 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 16337 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळल्यामध्ये आर्टस् 1972, कॉमर्स 9890, सायन्स 4130 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले त्यांना या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. तर इतर ज्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये कॉलेज मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांनी 25 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत आपले प्रवेश आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एसएससीच्या 63600 विद्यार्थ्यांना, सीबीएसई 1845 विद्यार्थ्यांना तर आयसीएसईच्या 2454 विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक 2 ते 10 मधील कॉलेज मिळाले आहे आणि या फेरीमध्ये प्रवेश घ्यायचा नसल्यास त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये उरलेल्या जागांसाठी प्रवेश घेता येईल. मुंबईतील नामांकित कॉलेजचे दुसऱ्या फेरीनंतरचे कट ऑफ मिठीबाई कट ऑफ आर्ट्स 85.60टक्के कॉमर्स 87.20 टक्के सायनस 82.20टक्के झेव्हियर्स कॉलेज आर्टस् - 93.40 टक्के सायन्स - 82.80 टक्के रुईया महाविद्यालय कट ऑफ 2019-20 आर्टस् 94 टक्के सायन्स 88.40 टक्के वझे केळकर कॉलेज आर्टस् - 86.40टक्के कॉमर्स 90 टक्के सायन्स 89.40 टक्के जय हिंद कॉलेज आर्टस् 90.80टक्के कॉमर्स -89.40 टक्के सायन्स - 82.40टक्के के सी कॉलेज आर्टस् - 87 टक्के कॉमर्स 89 ट्क्के सायन्स 84.80टक्के एन एम कॉलेज कॉमर्स - 90.40टक्के रुपारेल कॉलेज आर्टस् - 85 टक्के कॉमर्स 87 टक्के सायन्स 86.80टक्के साठ्ये कॉलेज आर्टस् - 71 टक्के कॉमर्स - 84.60टक्के सायन्स - 82.20 टक्के