मुंबई : एमटीएनएलच्या वांद्रे येथील इमारतीत भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या गच्चीवर 90 हून अधिक लोक अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 60 जणांना शिडीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक अद्यापही गच्चीवर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेलं नाही.

व्हिडीओ पाहा




आग मोठी असल्याने अग्निशमन दलाकडून 14 फायर इंजिन पाठवण्यात आले आहेत. अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या रोबोच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरु आहे.

व्हिडीओ पाहा



आग लागलेली इमारत नऊ मजल्यांची असून त्यापैकी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीदेखील झाली आहे.