मुंबई/ पुणे : विज्ञान आणि शास्त्रज्ञांच्या सुरू असलेल्या गळचेपीविरोधात आज विज्ञानप्रेमींनी मोर्चा काढला होता. मोर्चात लेखक, साहित्यविषयक संस्था, कलावंत, प्राध्यापक, शिक्षक, समाजविज्ञान संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.


ऑगस्ट क्रांती मैदान- पेडर रोड मार्गे गिरगाव चौपाटी आणि तिथून परत ऑगस्ट क्रांती मैदान, असा मोर्चा आयोजित केला होता. तर तिकडे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातही मोर्चा काढण्यात आल्यात.

सरकारनं आपला दृष्टीकोन बदलून वैज्ञानिक शोधकार्याला प्रोत्साहन द्यावं, अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार थांबवा, विज्ञान संस्थांच्या निधीत कपात करु नका, धार्मिक असहिष्णूता थांबवावी, शिक्षणात विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावं, विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनासाठी तीन टक्के तरतूद आणि शिक्षणासाठी दहा टक्के तरतूद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.