मुंबई : ‘मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर व्यासपीठावर आलात आता मराठा आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन द्या.’  अशी मागणी करत मोर्चेकरांनी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची कार आझाद मैदान जवळील परिसरात अडवली.


मोर्चा संपल्यानंतर नितेश राणे व्यासपीठावर आले होते. त्यामुळं काहीशा चिडलेल्या मोर्चेकरांनी मोर्चा संपल्यानंतर नितेश राणेंची कार अडवून लेखी आश्वासनाची मागणी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यानं त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन नितेश राणेंना गाडीतून बाहेर काढलं आणि दुसरीकडे नेलं. मात्र, तरीही मोर्चेकरांनी त्यांच्या गाडीभोवती घेराव कायम ठेवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने जी आश्वासन दिले त्याच्या लेखी आश्वासनाची मागणी मोर्चेकरांनी नितेश राणेंकडे केली. त्यानंतर नितेश राणेंनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्यापैकी काही मोर्चेकरांना विधान भवनात नेलं असल्याचं समजतं आहे.

VIDEO  



संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप

ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांना सवलती : मुख्यमंत्री

LIVE : मराठा मोर्चा : मी छत्रपती म्हणून नाही, मराठा समाजाचा घटक म्हणून मोर्चात: संभाजीराजे

भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली!

मोर्चेकरांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, ही सदिच्छा: शरद पवार

शेवटच्या मराठा मोर्चाकडून छत्रपतींची एक अपेक्षा!

संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले!

आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार

रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!

बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!