मुंबई : मुंबई विद्यापीठाला वेळेवर निकाल लावता आला नाही. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं आहे. राज्यपालांच्या सूचनेनंतर ते रजेवर गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या जागेवर देवानंद शिंदे हे सध्या मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहणार आहेत. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच व्हीजेटीआयचे संचालक आहेत.

आता व्हीजेटीआयची धुरा संभाळताना त्यांना मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी संभाळावी लागणार आहे. अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचं प्र-कुलगुरूपद रिक्त असल्यामुळं प्रशासनावर जोरदार टीका होत होती.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय पक्षांकडून सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु


मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता