आठ चिमुरड्यांना वाचवताना वसईत व्हॅनचालकाने प्राण गमावले
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2018 08:21 AM (IST)
विरारमध्ये मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला.
वसई : आठ शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव वाचवताना एका व्हॅनचालकाला आपला जीव गमवावा लागला. विरारमध्ये मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला. प्रकाश पाटील विरारच्या पारोळ भागातील रहिवासी होते. पारोळमधील आठ विद्यार्थ्यांना घेऊन ते विरार पश्चिममधील मस्ट्रिक शाळेत आले होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. रुस्तुमजी विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर पाणी भरले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची व्हॅन एका बाजूला झुकली. गाडीत असलेल्या चिमुरड्यांना वाचवताना प्रकाश एका मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अर्नाळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पाहा व्हिडिओ :