मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका आता मुंबईतील शाळकरी मुलांनाही बसणार आहे. 16 नोव्हेंबरपासून स्कूलबस चालवता येणार नाही, अशी माहिती स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.
स्कूलबस चालवण्यासाठी दररोज 20 हजारांची गरज आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे आठवड्याला 20 हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळे स्कूलबस चालवता येणार नसल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे.
नोटाबंदीचा पंतप्रधान मोदींचा निर्णय
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.