मुंबई : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीश मांगलेच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांगलेनं बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींना आयफोन भेट दिली असल्याचं सांगितलं आहे. या फोनमधील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांची खासगी माहिती चोरुन त्यांना ब्लॅकमेल केला गेल्याचाही पोलिसांना संशय आहे.

सतीश मांगलेनं ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींना आयफोन दिले होते माहिती समजते आहे. पोलीस त्या सर्व सेलिब्रिटींकडून माहिती घेऊन या प्रकरणाची अधिक तपास करणार आहेत.

या आयफोनमध्ये एका  सॉफ्टवेयरच्या मदतीनं त्यानं या फोनमध्ये स्पाय अॅप टाकले होते. ज्याच्या मदतीनं त्यानं या फोनमधील माहिती चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी एबीपी माझानं या सेलिब्रिटींशी संपर्कही साधला. मात्र, त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मोपलवारांकडे खंडणी मागितल्याचा आरोप, मांगले दाम्पत्य अटकेत

अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सतिश मांगले आणि त्यांची पत्नी श्रद्धा मांगले यांना काही दिवासांपूर्वीच अटक करण्यात आली आहे.

एक कोटींची खंडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना दिला होता, त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई करण्यात आली होती.

या व्हिडीओमध्ये एक कोटींची रक्कम स्वीकारल्या दावा करण्यात आला आहे. राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधातील व्हायरल ऑडिओ क्लीप सतिश मांगले यांनीच माध्यमांसमोर आणली होती.