मुंबई : दहशतवादी दाऊद इब्राहिच्या मुंबईतील संपतील लिलाव येत्या 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी या लिलावात सहभागी होऊन दाऊदच्या अफरोज हॉटेलवर ते बोली लावणार आहेत. जर स्वामी चक्रपाणी यांना अफरोज हॉटेल विकत घेण्यात यश आलं तर ते हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार आहेत. स्वत: स्वामी चक्रपाणी यांनी ही माहिती दिली आहे.

या हॉटेलची किंमत 1 कोटी 15 लाख रुपये आहे. मागे देखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेतली होती आणि नंतर दहशतवादाचं प्रतिक सांगून गाजियाबादमध्ये ही चारचाकी पेटवून दिली होती. येत्या 14 नोव्हेंबर रोजी पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.

सीबीआयनं आतापर्यंत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील अशा एकूण 10 प्रापर्टी जप्त केल्या आहेत. ज्यामधील 3 गोष्टींचा लिलाव होणार आहे. याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील 5 घरं आणि हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे. या हॉटेलची मूळ किंमत 1 कोटी 15 लाख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता या लिलावात चक्रपाणी हे हॉटेल मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO :