डोंबिवली : भारताला जगात महासत्ता म्हणून नेतृत्व करायचं असेल तर डिजिटल इंडिया शिवाय पर्याय नाही, असा संदेश संस्कार भारतीच्या डोंबिवली समितीच्या रांगोळी कलाकारांनी नववर्षाच्या स्वागतासाठी श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे काढण्यात आलेल्या महारांगोळीतून दिला आहे
गेली 35 वर्षांपासून साहित्य व ललितकला संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्कार भारतीने 'डिजिटल बनो' मार्फत जगाशी जोडणाऱ्या सर्वच Social App सोबतच पारंपरिक चिन्हांचा देखील समावेश या रांगोळीत केलेला आहे.
सुमारे २०० किलो रांगोळी, १५० किलो रंग, ३० रांगोळी कलाकार आणि अखंड ८ तासांच्या परिश्रमातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
समाजात नसूनही सोशल कनेक्ट असणाऱ्या सर्वांना 'डिजिटल बनो, भारत को महासत्ता बनाओ' चे आवाहन संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.