ठाणे : फेरीवाल्यांना महापालिका आयुक्त आणि पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. कारण, आज कारवाई होण्याआधीच ठाण्यातले 80 टक्के फेरीवाले गायब झाले आहेत. तर अनेकजण कारवाईच्या भीतीपोटी पळ काढताना दिसले.

काही दिवसांपूर्वी कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना 100 ते 150 फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात गांवदेवी व स्टेशन रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली. यावेळी 25 अनधिकृत गाळे तोडण्यात आले. तसेच अनेक फेरीवाल्यांचा माल जप्त करण्यात आला.

तर आज स्टेशन रोड, वसंत विहार आणि वर्तकनगर आदी परिसरात आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. पण आयुक्त आणि पोलिसांचा धसका घेतलेल्या 80 टक्के फेरीवाल्यांनी भीतीपोटी पळ काढला.

संबंधित बातम्या

उपायुक्तांना मारहाणीनंतर ठाणे पालिका आयुक्त जयस्वाल आक्रमक


ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना 100-150 फेरीवाल्यांकडून जबर मारहाण