Sanjay Raut on World Cup 2023: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) चा महामुकाबला पार पडला. या सामन्यात टीम इंडियासह (Team India) देशातील 140 कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं. पण वर्ल्डकपच्या महाअंतिम सामन्यासाठी देशाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. यावरुन सोशल मीडियातही जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर भाष्य केलं आहे. पहिल्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला आणि संघाला आमंत्रित केलं नाही, इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं म्हणून निमंत्रण दिलेलं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी बीसीसीआयवर (BCCI) हल्ला चढवला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "वर्ल्डकप भारतीय संघ हरल्याचं दुख: सर्वांनाच आहे. खेळात हार जीत होत असते. मात्र, जो संघ सलग 10 सामने जिंकला, तो कालचा समाना हरला. क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी शिरली आहे. त्या लॉबीनं वल्लवभाई स्टेडीएमचं नाव बदलले आणि समाना तिथे घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत, अशाच थाटात भाजप होता. निकालानंतरची जी व्यवस्था केली होती. त्यावर पाणी फिरलं गेलं."
"कपिल देव आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं"
"पहिला विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला आणि संघाला आमंत्रित केलं नाही. इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं म्हणून निमंत्रण नाही.", असं म्हणत वर्ल्डकप 2023 च्या फायनलचं आमंत्रण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना न देण्याच्या बीसीसीआयच्या कृत्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मोदी तिथे आहेत म्हणून विश्वचषक जिंकला, असं भासवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
"बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार वागल्यावर नोटीस का देता?"
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस धाडत प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश देण्यात आले आहेत. यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. स्मृती स्थळावर गद्दार आणि बेईमानांनी पाय ठेऊ नये, गद्दारांना तुडवा, असं बाळासाहेबांची शिकवण सांगते. त्यांच्या शिकवणीनुसार वागल्यावर नोटीस का देता? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :