Sanjay Raut PC Today (मुंबई) : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे 103 दिवसांनी जेलबाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी पहिला हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर चढवला. "आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला ईडीने जी अटक केली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला" असं संजय राऊत म्हणाले. 


Sanjay Raut PC Today : संजय राऊत काय म्हणाले? 


"तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही.  कोठडीतले दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही. 


कोर्टाने मला जामीन दिला आहे. पूर्ण देशात जल्लोषाचा माहोल झाला. मी टिपणी करणार नाही, ना ईडी ना ज्यांनी कट रचला त्यांच्यावर. त्यांना आनंद मिळाला असेल तर ठिक. माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगलं, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहतं. मात्र अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हाही असं घडलं नव्हतं. शत्रूबाबतही घडलं नसेल. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही, सिस्टिमला दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी सर्वांना मिळते, त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले. 


Sanjay Raut PC Today : महाराष्ट्र सरकारने काही निर्णय चांगेल घेतले


महाराष्ट्रात नवं सरकार बनलं आहे, काही निर्णय महाराष्ट्र सरकाने चांगले घेतले आहेत त्याचं स्वागत करेन, विरोधासाठी विरोध करणार नाही. जे देश, राज्य किंवा जनतेसाठी भल्याचं असेल त्याचं स्वागत करेन, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत, जेव्हा मी पेपर वाचायला मिळत होता, तेव्हा हे पाहात होतो, गरिबांना घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे चांगले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


Sanjay Raut PC After Bail : जेलमध्ये भिंतींशी बोलावं लागतं


जेलमध्ये राहणं आनंदाची बाब नाही. मोठमोठ्या भिंती असतात, त्या भिंतींशी बोलावं लागतं. वीर सावरकर दोन वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये राहिले, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहिले असतील? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. 


राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत


मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले. 


मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे नसतात, राज्याचे असतात. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटणार. त्यांना सांगणार माझ्यासोबत काय घडलं ते. 


Sanjay Raut On  Raj Thackeray : राज ठाकरेंवर निशाणा


आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला बेकायदेशीर अटक झाली, असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारनी लावला, असं संजय राऊत यांनी नमूद केलं. 


हे सरकार घटनाबाह्य


हे सरकार घटनाबाह्य आहे, त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. पण त्यांनी घेतलेले काही मोजके निर्णय घेतले त्याबद्दल मी बोललो. जे लोक संवैधानिक पदावर बसले आहेत, त्यांचीशी देशाच्या चांगल्या गोष्टीबाबत चर्चा व्हायला हवी. 


मी जेलमध्ये वाचलं होतं, फडणवीस म्हणाले होते, आपल्या महाराष्ट्रात कटुता वाढली आहे, ती कमी व्हावी, त्याचं मी स्वागतही केलं होतं. 


भारत जोडो यात्रेचं स्वागत करतो, माझी तब्बेत चांगली असेल तर जरुर मी त्यांच्या यात्रेत सहभागी होईन, त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  


Sanjay Raut Press conference VIDEO



राज ठाकरे काय म्हणाले होते? 




संबंधित बातम्या