Sanjay Raut on VBA : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) महाराष्ट्रात 27 जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव ठेवला होता. याच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त केली आहे. कोण कोठे जिंकेल याच्यावर चर्चा केली. जिकणं महत्वाचं आहे, यावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि आमचे एकमत आहे", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


वंचित हा महत्वाचा घटक पक्ष आहे


संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आम्ही जागा वाटपावर सविस्तर चर्चा केली. प्रत्येक सीटवर चर्चा केली. कोण कोठे जिंकेल याच्यावर चर्चा केली. जिकणं महत्वाचं आहे. जागा कोण किती लढतं हे महत्वाचं नाही. प्रकाश आंबेडकरांची देखील हीच भूमिका आहे. आम्ही चार पक्ष आहोत ,असे मानतो. त्यामध्ये वंचित सुद्धा आहे. इतरही लहान पक्ष आहेत. वंचित हा महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगत रित्या कोणतीही चर्चा करत नाहीत, असेही राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. 


आम्हीही म्हणतो आम्ही 48 जागांवर काम करतोय, काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे


पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त केली आहे. आम्हीही म्हणतो आम्ही 48 जागांवर काम करतोय. काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही 48 मतदारसंघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा अठ्ठेचाळीसच आहेत. त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील. ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे, त्याच्यावर आम्ही चारही पक्ष चर्चा करत आहोत. कालपासून पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांचेही मार्गदर्शन आम्हाला आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले. महाविकास आघाडीचे वाटप सुरुळीतपणे पार पडलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्वाचा घटक पक्ष आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उमेदवारीबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलत होतो, असे राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar : वंचितने मागणी केलेल्या 27 जागा कोणत्या, ज्यामुळे महाविकास आघाडीचा तिढा वाढणार