VBA demands from MVA : वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीकडे (MVA) 27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. 


20 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा 


महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचाआणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे. तर वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. 


वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव सादर 


आम्ही २७ जागांसाठी यादी दिली. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. 12-12-12-12च्या फॉर्म्युल्यासाठी आम्ही आग्रही नव्हतो.ज्या दिवशी पवार साहेब ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर देखील येतील, असं धैर्यवान पुंडकर म्हणाले आहेत.  


वंचितच्या महाविकास आघाडीकडे 4 मागण्या 


महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना मविआचा उमेदवार म्हणून घोषित करावे. मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी तर 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा 4 प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत. 


निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे वचन द्या 


शिवाय, वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aaghadi) कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. मविआच्या प्रत्येक घटकानं लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणूकीपूर्वी आणि नंतर भाजपात सामील होणार नाही, असा प्रस्ताव वंचितकडून (Vanchit Bahujan Aaghadi) देण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


VBA and Manoj Jarange : मनोज जरांगेंना जालन्यातून, अभिजीत वैद्य यांना पुण्यात उमेदवारी द्या, मविआच्या बैठकीत वंचितच्या 4 मोठ्या मागण्या