Sanjay Raut :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि ईडीवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेच्या (पीएमसी बँक) घोटाळ्याची क्रोनोलॉजी सांगतली असून ईडीला सवाल केला आहे. संजय राऊत यांनी मागील आठवड्यापासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ईडीविरोधात आघाडी उघडली आहे. 


संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत ट्वीट करून म्हटले की, राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड आहे. वर्ष 2015-16 मध्ये देवेंद्र लधानी यांच्या बँक खात्यात वाधवान यांनी 4.15 कोटी रुपये जमा केले. लधानी हे किरीट सोमय्या यांचे भागिदार आहेत. किरीट सोमय्या यांना या बँक घोटाळ्याचा फायदा झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ईडीने आतापर्यंत नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांना अद्याप अटक का केली नाही, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. 


 






राऊत या आठवड्यात ईडीचा घोटाळा बाहेर काढणार?


मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालये ही खंडणीखोर बनवली असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती. महाराष्ट्राला कसे लुटले, कोट्यवधींची अफरातफर केली याची सगळी माहिती उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. कुणाला आमच्या आंगावर यायचं असेल त्यांनी जरूर यावं. एक दिवस त्यांना या ठिकाणाहून तोंड काळे करून जावं लागेल. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याचं ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे या आठवड्यात संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha