युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप खासदार पहिल्यांदाच समोरासमोर!
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2017 08:54 AM (IST)
मुंबई : युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार आज पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे. केंद्राच्या अखत्यारित असलेले राज्यातील प्रकल्प तसंच अपूर्ण प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.