Drive-in Covid-19 Vaccination : मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये असणाऱ्या कोरोना लसीकरण केंद्राचं उदघाटन होण्यापूर्वीच या ठिकाणी नागरिकांनी रिघ लावल्यामुळं लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे. त्यामुळं हे देशआतील पहिलंवहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र ठरत आहे.
अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग देशात सुरु झाला असून, मुंबईतील दादर भागात याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना अनेकदा लसीकरणासाठी रांगेत उभं राहण्यास काही अडचणी येतात. अशा सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सदर सुविधेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना हा उपक्रम उत्तम असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचं उदघाटन होणार होतं. पण, नागरिकांच्या वाहनांची रिघ पाहता इथं लसी देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील तील दिवसांपासून मुंबईत लसींच्या तुटवड्यामुळं 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचं लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. पण, आता मात्र ही मोहिम पुन्हा एकदा एका नव्या रुपानं सुरु झाली आहे. अशीच आणखी दोन- तीन केंद्र सुरु करण्याची मागणीही नागरिकांनी इथं केली.
खोट्या आणि बदनामीकारक दाव्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करावी, शिवसेनेची मागणी
सर्वांकडेच वाहनं असतील असं नाही, पण थेट केंद्रावर जाऊन लस घेण्यासोबत वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्याच्या या उपक्रमाचं स्वागत सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रावर सुरुवातीला नोंदणी कक्ष असून पुढे नागरिकांना ही लस मिळत आहे. आजच्या दिवसभरात इथं 1500 लसी उपलब्ध झाल्या असून, यापुढे ही संख्या नेमकी कोणता आकडा गाठते हे पाहणं महत्त्वाचं असेल.