Sanjay Raut Controversial Tweet : महाविकास आघाडीच्या शनिवारी (17 डिसेंबर) निघालेल्या महामोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हटलं होतं. याला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चातील गर्दीचा एक व्हिडिओ ट्वीट केला... आणि हा ट्वीट केलेला व्हिडीओ शनिवारच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या नसून मराठा क्रांती मोर्चाचा 2017 चा असल्याचा समोर आलं. त्यानंतर भाजपसह मराठा संघटनेसुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका केली.   एका ट्वीटमुळे संजय राऊत यांना मराठा संघटनांचा रोष सुद्धा ओढवून घ्यावा लागत आहे.


महाविकास आघाडीचा शनिवारी 17 डिसेंबरला निघालेला मोर्चा हा एक नॅनो मोर्चा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली... आता याच प्रतिक्रियाला उत्तर देण्यासाठी राऊत यांनी तातडीने एक व्हिडिओ ट्विट करत जेजे ब्रिज वरील गर्दी दाखवत ' ज्याला तुम्ही नॅनो मोर्चा होतात तो हाच !' असं म्हणत उत्तर देऊन टाकलं... मात्र हे व्हिडीओ ट्वीट काही वेळात राऊतांवरचं उलटले... कारण ट्वीट केलेल्या राऊतांचा व्हिडिओ हा महाविकास आघाडीचा नसून 9 ऑगस्ट 2017 मध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा समोर आलं. आणि मग काय भाजप मराठा संघटना यांनी राऊतांना टार्गेट करायला सुरुवात केली. 



संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाची गर्दी दाखवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे व्हिडिओ अपलोड करून आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला. त्यामुळे यांच्यावर कारवाईची मागणी मराठा संघटनांनी केली आहे. शिवाय, राऊत यांनी माफी मागावी असा इशारा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.  सोबतच, छत्रपती संभाजी राजे यांनी राऊत यांच्या ट्वीटवर समाचार घेत, 'आज नसलेली ताकद दाखवताना एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवले, त्यांच्याच मोर्चाचा वापरताना थोडी तरी तमा बाळगा !' असा इशारा दिला आहे... त्यामुळे एका ट्वीटवर ओढवलेला रोष पाहता संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांच्या कालच्या केलेल्या ट्वीटमध्ये आणि आजच्या दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केला आहे.


संजय राऊत यांनी सर्वप्रकारे सारवासारव करण्याचा जरी पूर्णपणे प्रयत्न केला. तरी राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटना ठाम आहेत... त्यामुळे राऊत यांचे एका ट्विट मुळे ओढवलेला रोष पुढे कसा राहतो ? हे पहावं लागेल ...मात्र या ट्वीट वरील रोषानंतर सर्वच राजकीय नेते ट्विट करताना घाई गडबड न करता पूर्णपणे शहानिशा करूनच आपले ट्वीट, व्हिडिओ, फोटोज अपलोड करतील.