Sanjay Raut Phone Tapping News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फोन टॅपिंगवरुन भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. माझे फोन आताही टॅप होत आहेत. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न राबवला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन टॅप केला जात होता. रश्मी शुक्ला यांनी हे केलं आणि त्यांनी कुणाला दिल हे सगळ्यांना माहीत आहे. आता कुलाब्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीनंतरही काय चाललंय हे माहीत व्हावं यासाठी माझा फोन टॅप केला जात होता. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. आणि महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख होते. गोव्यात भाजप येणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगतोय.
राऊतांनी म्हटलं की, देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल. पण आता लोकशाहीच देशातली धोक्यात आली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. विधानसभेचं काम होऊ दिलं नाही, हे विरोधी पक्षनेत्यांनी केलं, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, राज्यपाल हटवले पाहिजेत. हे महाराष्ट्राचे म्हणणं आहे. घटनात्मक पदांवर असं राजकीय व्यक्ती बसवली की असं होतं. राज्यपालांनी तात्काळ तारीख दिली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: