मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त 12 हेक्टर जागा लागते. मात्र मुख्यमंत्र्यांनी 30 हेक्टर जागेला मंजुरी दिली. 18 हेक्टर जमीन मेट्रोला आणि उरलेली 12 हेक्टर जमीन विकासकाला देण्याचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विरोधानंतरही मुख्यमंत्री मेट्रोचं कारशेड आरेमध्येच बनवण्यासाठी आग्रही का आहेत, असा सवाल निरुपम यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.
संजय निरुपम यांचे आरोप काय आहेत?
- मेट्रो कारशेडसाठी 12 हेक्टर जागा लागते, मात्र मुख्यमंत्र्यांचा 30 हेक्टर जागेसाठी हट्ट
- उर्वरित 18 हेक्टर जमीन बिल्डरला देण्याचा घाट
- यातून मुख्यमंत्र्यांना 18 हजार कोटींचा फायदा होणार
- मेट्रोसाठी रेसकोर्स, कलिना, कांजुरमार्गची जागा उपलब्ध होती
- मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांकडे डोळेझाक
- कमर्शिअल आणि रियल इस्टेटसाठी सरकारकडून आरे कॉलनीचा हट्ट