ठाणे : तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या नागरिक आणि रिक्षाचालकाला, टोईंग कर्मचाऱ्यांनी वाहतूक पोलिसासमोरच रॉडने मारहाण केली. ठाण्यातील घोडबंदर रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला.
ठाणे वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅनवरील कर्मचारी रिक्षात बसलेल्या 22 वर्षीय तरुणीला अश्लिल इशारे करत होते. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी त्यांना विरोध केला. पण मुजोर टोईंग कर्मचाऱ्यांनी तरुणीसह रिक्षाचालक आणि नागरिकांना रॉडने मारहाण केली. यावेळी वाहतूक पोलिसाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
यानंतर रिक्षाचालक आणि नागरिकांनी टोईंग व्हॅन अडवली आणि पोलिसांना फोन करुन कर्मचाऱ्यांना कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी टोईंगच्या चार कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांच्यावर विनयभंग, अश्लिल हावभाव करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चारही आरोपींना कोर्टात सादर केलं असून त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच वाहतूक पोलिसाची चौकशीही सुरु आहे. याशिवाय पोलिसांनी रिक्षा आणि टोईंग व्हॅन ताब्यात घेतली आहे.
टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने मारहाण
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Aug 2017 03:54 PM (IST)
हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी त्यांना विरोध केला. पण मुजोर टोईंग कर्मचाऱ्यांनी तरुणीसह रिक्षाचालक आणि नागरिकांना रॉडने मारहाण केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -