Sameer Wankhede Received Threat : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियावरून वानखेडेंसह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणाची मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आहे. धमकी देणारा पाकिस्तानी हँडलर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये..  धमकी देणाऱ्यांनी दाऊदचं नाव लावून धमकी देण्यात आली आहे. 


आयआरएस अधिकारी समीर वानखडे यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांना  वारंवार धमकीचे मेसेज येत आहे.  वानखेडेंसह  त्यांच्या कुटुंबीयांना देखील धमकीचे मेसेज येत आहेत.  धमकीचे मेसेज आल्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त लेखी तक्रार यांना दिली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितले की, मला आणि माझ्या कुटुंबाला अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या येत आहेत. यामुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. 


समीर वानखेडेंनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या एका फेक अकाउंटवरून दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या मिळत आहेत. माझ्या परिवारालाही धमक्या मिळत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार वानखेडेंनी धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी  तात्काळ संबंधित माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. 


समीर वानखेडे यांच्या अटकेला 8 जून पर्यंत स्थगिती दिली


सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. सीबीआयचे (CBI) म्हणणे आहे की, ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेच्या बदल्यात समीर वानखेडेंनी 25 कोटींची मागणी केली होती. या संबंधित प्रकरणात समीर वानखेडें व्यतिरीक्त इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अटकेला कोर्टाने  8 जून पर्यंत स्थगिती दिली. .यादरम्यान कोर्टाने वानखेडेंना सक्त आदेश दिले होते की, शाहरूख खान सोबतचे व्हाॅट्अॅप चॅट पब्लिक करणार नाही. तसेच माध्यामांसोबत कोणताही संबंध ठेवायचे नाही. 


समीर वानखेडेंनी दिला सत्यमेव जयतेचा नारा


यापूर्वी सीबीआयने 20 आणि 21 मे रोजी समीर वानखेडें सुमारे 11 तास चौकशी केली होती. सीबीआय पुढे हजर होण्यापूर्वी समीर वानखेडेंनी सत्यमेव जयतेचा नारा दिला होता. 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


WTC Final 2023 : वॉर्नर-स्मिथ विरुद्ध कामगिरीच्या बळावर अश्विनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार? फायनलच्या संघात जडेजाचीही गरज