मुंबई: समाजवादी पक्ष मुंबई महापौरपदाच्या आखाड्यात उतरणार नसल्याचं आज जाहीर करण्यात आलं. ‘समाजवादी पक्ष महापौर पदाचा अर्ज भरणार नाही आणि तसेच सपाची सध्या तरी काँग्रेसशी युती नाही.'  असं समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी स्पष्ट केलं.


‘समाजवादी पक्ष महापौर पदाची निवडणूक लढवणार नाही. तसंच आमची काँग्रेसशी अद्याप युती नाही. पण तरीही अशोक चव्हाण यांनी आमची युती असल्याचं परस्पर जाहीर केलं. काँग्रेसनं सर्वात आधी जाहीर करावं की, आमचा शिवसेनेशी कोणतीही छुपी अथवा उघड युती नाही. तरच आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरु करु.’ असं रईस खान यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेत यंदा सपाचे एकूण 6 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सपा आता काँग्रेसला समर्थन देणार की दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुरुवातीला समाजवादी पक्ष महापौर निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता आपण निवडणूक लढवणार नसल्याचं समाजवादी पक्षानं जाहीर केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनंही अद्याप काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी भूमिका जाहीर केलेली नाही. तर मनसेनंही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनंतर समाजवादी पक्षानंही आपली भूमिका स्पष्ट जाहीर न करणंच पसंत केलं आहे. यामुळे महापौर निवडणुकीत आता आणखी रंगत भरली आहे.

संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीचं वेट अॅण्ड वॉच, महापौर निवडणुकीविषयी भूमिका गुलदस्त्यातच

मुंबई महापालिकेत मनसे ‘किंगमेकर’ ठरणार?

LIVE: मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित

शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर

महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?

शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं

मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना

..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?

महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..

उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी

मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…