मुंबई: मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत दिलं नसल्यानं सध्या मनसेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. त्यामुळे मनसे कुणाच्या पारड्यात वजन टाकणार यावर मुंबईच्या सत्तेचं गणित अवलंबून आहे.
सध्या मनसेही महापौरपदाच्या रेसमध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे. मनसेतर्फे दिलीप लांडेंनी महापौरपदाचा फॉर्म नेल्यानं चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ऐनवेळी मनसे महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार की नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
ऐनवेळी आपले पत्ते उघडे करुन मनसे कुणाला धक्का देणार? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत.
दरम्यान, मनसेकडे सर्व पर्याय खुले आहेत. निवडणुकीआधी जे झालं ते झालं. मात्र, जिथे चुका आहेत तिथे आम्ही बोलूच. मनसेला कुणीही गृहीत धरु नये.”, असे मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई काल म्हणाले होते.
'मुंबईचा महापौर मराठी माणूसच असेल. मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेऊ', असंही नितीन सरदेसाई यांनी सांगितलं होतं.
मुंबई महापालिकेत मनसेने सपाटून मार खाल्ला. मनसेचे अवघे 7 नगरसेवक निवडून आले. मात्र, या सातही नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झालं आहे. भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून आपापल्या परिने महापौरपदासाठी चाचपणी सुरु असल्याने मनसेचा भाव वधारला आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेची सर्वांनाच उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या:
LIVE: मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित
शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर
महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !
कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…