ठाण्यात नऊवारी साडी नेसून महिलांची सायकल रॅली
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2017 02:01 PM (IST)
ठाणे: आपल्या व्यस्त आयुष्यात स्वतःच्या स्वास्थासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. नऊवारी साज आणि सायकलवर स्वार झालेल्या महिला सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची खास उपस्थिती होती. वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योग आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढावा असे आवाहन सोमण यांनी महिलांना केले. गडकरी रंगायतनपासून संपूर्ण ठाणे शहरात रॅली काढून महिलांनी आरोग्यविषयक संदेश दिला. येत्या १९ मार्च रोजी ठाण्यात चालण्याच्या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमण यांनी यावेळी दिली.