मुंबई: बॉलिवूडचा दबंग भाईजानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाच्या यशानंतर, आता त्याचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'टायगर जिंदा है' असे या चित्रपटाचे नाव असून तो पुन्हा कतरीना कैफसोबत रोमॅन्स करताना दिसणार आहे. यशराज फिल्म्सने याबाबतचे ट्वीट करून याची माहिती दिली.


 

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास करणार असून, हा चित्रपट 2017 ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

 


 

'टायगर जिंदा है' या चित्रपटासंबंधातील पहिले पोस्टर यशराज फिल्मसने प्रसिद्ध करताना, सलमान खानचा आगामी चित्रपट 'टायगर जिंदा है' असल्याचे म्हटले आहे. तसेच हा चित्रपट 2017 ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहितीही दिली आहे.

 



 

सलमानचा 'एक था टायगर' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला 'रॉ' या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते.