विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेने उधळली
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 13 Sep 2016 10:44 AM (IST)
मुंबई: विदर्भवाद्यांची मुंबईतील पत्रकार परिषद मनसेने उधळली. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. विदर्भवादी नेत्यांनी आज मुंबई पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र त्याठिकाणी अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत मनसेने गोंधळ घातला. त्यामुळं विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली. हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे, त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळणं यात काहीही गैर नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली. दरम्यान, मनसेच्या राड्यानंतर काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.