वसई : वसईत चोर समजून एका सेल्सगर्लला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीत कार्यरत असलेल्या सुषमा पांडे यांना काही जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुषमा पांडे यांना मारहाण झाली होती. वसईतील पापडी भागामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर या कंपनीत काम करणाऱ्या महिला संतप्त झाल्या आहेत.

मारहाणीच्या निषेधार्थ शेकडो सेल्समन महिलांनी वसई पोलिस ठाण्यात आज घेराव घातला. मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे मारहाण झाली त्यावेळी दोन पोलिस कर्मचारी उपस्थित असल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.